Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शेतकऱ्यांची व्यथा : वीज नसल्याने पिके करपतायेत
धुळे तालुक्यातील शेतकरी सध्या गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, भूईमुग, कांदा, टरबूज आणि विविध भाजीपाला तसेच फळपिकांची लागवड करत आहेत. मात्र, उन्हाळ्याची सुरुवात होताच तापमान वाढत आहे, परिणामी रब्बी पिकांना अधिक पाण्याची गरज भासत आहे. मात्र, शेतीसाठी आवश्यक त्या प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यांनी सांगितले की, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अनेक ट्रान्सफार्मर बंद पडले आहेत. काही भागात ट्रान्सफार्मरमधील ऑईलच संपल्याने वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. ऑईलचा तुटवडा असल्याने नवीन ऑईल उपलब्ध होण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागतात, तोपर्यंत ट्रान्सफार्मर सुरू होत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
![]() |
| - Advertisement - |
शेतकऱ्यांच्या या समस्येबाबत कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, रब्बी हंगामात जर शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादन घटेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
त्यामुळे, महावितरणने त्वरित दखल घेत नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करावेत, ट्रान्सफार्मरसाठी आवश्यक असलेले ऑईल तातडीने उपलब्ध करून द्यावे, वीजपुरवठा सुरळीत करावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार – पाटील
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आपण ऊर्जामंत्र्यांना निवेदन देऊन यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करू, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कुणाल पाटील यांनी दिला आहे.
शेतीसाठी वीज पुरवठा हाच शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न असून यावर तातडीने तोडगा निघावा, अन्यथा शासनाने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.
— धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


