Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
तिरंगा फडकवण्याचा वाद जिवावर बेतला?
यश देवरे हा स्वराज्य सागरी सेवांमध्ये (Swarajya Maritime Services) O.S. (Ordinary Seaman) म्हणून कार्यरत होता. २६ जानेवारी रोजी त्याने एम.टी. अथेना वन (MT Athena One) या जहाजावर भारतीय ध्वज अर्थात तिरंगा फडकवला. याचा फोटो त्याने आपल्या मोबाईल स्टेटसवर देखील ठेवला. त्यादिवशी त्याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याचा अचानक संपर्क तुटला.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा संशयास्पद हस्तक्षेप
यशच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, जहाज पाकिस्तानच्या सागरी हद्दीत असताना काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिरंगा फडकवण्यावर आक्षेप घेत वाद घातला. यशने घरच्यांना याबाबत माहिती दिली होती. काही वेळानंतर जहाजावरील अधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांना ईमेलद्वारे "यश समुद्रात पडला असून, तो बेपत्ता आहे" अशी माहिती देण्यात आली. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा देण्यात आलेला नाही.
कुटुंबीयांच्या मागण्या आणि सरकारकडे धाव
यशच्या भावाने नयन देवरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यशच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच केंद्र सरकारकडेही या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
"आमचा ठाम संशय आहे की तिरंगा फडकविल्याच्या कारणावरून पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी यशला समुद्रात फेकले आहे. सरकारने याचा तपास करून दोषींवर कारवाई करावी." – नयन देवरे, बंधू.
![]() |
| - Advertisement - |
या घटनेमुळे भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांनुसार कोणत्याही देशाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या हिंसक कृत्यास परवानगी नाही. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानकडे अधिकृत तक्रार नोंदवून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दबाव टाकावा, अशी मागणी होत आहे.
सध्या यशचा कोणताही शोध लागलेला नाही. मात्र, कुटुंबीयांना आशा आहे की सरकार या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून सत्य समोर आणेल आणि यशला न्याय मिळवून देईल.
---
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

