धुळे दर्पण न्यूज :- जिल्ह्यातील नागरी प्रशासन अधिक सुलभ आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने धुळे येथे नवीन, अत्याधुनिक चार मजली जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ₹46.98 कोटी निधी मंजूर केला आहे.
हा निर्णय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, मंत्री मा. गिरीश महाजन, मंत्री मा. चंद्रकांत पाटील, आमदार मा. जयकुमार रावल, आणि आ. अनुप (भैय्या) अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवांसाठी अधिक सोयीस्कर आणि वेगवान सुविधा मिळणार आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वैशिष्ट्ये:
* इमारत: चार मजली अत्याधुनिक वास्तू
* एकूण निधी: ₹46.98 कोटी
* सुविधा: सर्व शासकीय विभाग एकाच ठिकाणी, डिजिटल सेवा, वेटिंग हॉल, जलद निर्णय प्रक्रिया
* बांधकाम प्रक्रिया: जुनी कौलारू इमारत पाडून नवीन इमारतीचे निर्माण
* प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज: आगामी दोन वर्षांत पूर्णत्वास
![]() |
| - Advertisement - |
✔ शासकीय सेवांसाठी एकाच ठिकाणी सोय
✔ डिजिटल सुविधा आणि जलद प्रक्रिया
✔ नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्थापन
✔ प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
लोकप्रतिनिधींचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा
आ. अनुप (भैय्या) अग्रवाल यांनी 7 जानेवारी 2025 रोजी महसूल मंत्री मा. बावनकुळे यांच्याकडे थेट पत्राद्वारे या प्रकल्पाचा प्रस्ताव दिला होता. या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रस्ताव मार्च 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
"हे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे केवळ एक इमारत नसून, धुळेकरांसाठी सुविधा केंद्र ठरणार आहे. यामुळे सरकारी कामकाज जलद होईल, नागरिकांना वेगवान सेवा मिळेल, आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनेल."
धुळेच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय
धुळे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी या निर्णयामुळे नागरीकरणाचा वेग वाढेल, शासकीय यंत्रणा अधिक गतिशील होईल, आणि जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देईल.
धुळेकरांच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



