धुळे दर्पण न्यूज :- साक्री विधानसभा मतदारसंघातील आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन आमदार सौ. मंजुळा गावीत यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. पिंपळनेर किंवा दहिवेल येथे तातडीने ट्रॉमा सेंटर मंजूर करावे, तसेच साक्री किंवा पिंपळनेर येथे महिला-बालरुग्णालय स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ आणि जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महिला आरोग्यासाठी विशेष सोयी आवश्यक
विधानसभेत बोलताना आ. मंजुळा गावीत म्हणाल्या, “माझा साक्री मतदारसंघ हा आदिवासीबहुल आहे. येथे एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालये आणि १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, अवघड प्रसूतीसाठी महिलांना धुळे किंवा नंदुरबार येथे जावे लागते. अशा परिस्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्यास अनेक महिलांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.”
![]() |
| - Advertisement - |
साक्री मतदारसंघातून दोन मोठे महामार्ग जातात. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. अपघात झाल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी पिंपळनेर किंवा दहिवेल येथे ट्रॉमा सेंटर मंजूर करावे, अशी ठाम मागणी आमदार गावीत यांनी केली.
“दि. ४ मार्च रोजी दिघावे-प्रतापपूर रस्त्यावर भीषण अपघात झाला. त्या अपघातात जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, संबंधित डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. या हलगर्जीपणामुळे जखमींच्या जीवाला धोका निर्माण झाला,” असे सांगत त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गवळे, १०८ रुग्णवाहिका चालक आणि संबंधित डॉक्टर यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच डॉ. गवळे यांची बदली करावी, अशी जोरदार मागणी आमदार गावीत यांनी केली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महिला बचत गटांना आधार – जागा आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्या
महिला सक्षमीकरणासाठी बचत गट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी जागा आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असेही आमदार गावीत यांनी विधानसभेत नमूद केले.
![]() |
| - Advertisement - |
महिलांसाठी मोफत कर्करोग उपचार आणि पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी
“कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांसाठी कर्करोगावरील उपचार मोफत उपलब्ध करून द्यावेत. तसेच साक्री पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी ७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी,” अशी मागणी करत त्यांनी साक्री मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न सुरूच राहतील – आमदार मंजुळा गावीत
यापूर्वीही आमदार मंजुळा गावीत यांनी साक्री मतदारसंघाच्या विकासासाठी विविध प्रश्न विधिमंडळात मांडले आहेत. आरोग्य, महिला सक्षमीकरण, रस्ते, शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या क्षेत्रांत अधिक सुधारणा व्हावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा साक्री मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


