धुळे दर्पण न्यूज :- दोंडाईचा, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रावल संस्थानात यंदाही होळीचा सण परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोंडाईचा येथील रावल गढी ही ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू असून, येथे शेकडो वर्षांपासून होळी सणाची परंपरा अखंडित सुरू आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
परंपरेचे जतन आणि विधीवत पूजन
होळी सणाच्या तयारीसाठी दांडी पौर्णिमेच्या दिवशी विधीवत पूजा करून होळीची दांडी उभारण्यात येते. ही दांडी होळी पौर्णिमेपर्यंत त्या जागीच ठेवली जाते. होळी पौर्णिमेच्या दिवशी दांडीसह संपूर्ण होळीची रचना करण्यात येते आणि त्यानंतर पारंपरिक विधीनुसार पूजन करून होळीचे दहन केले जाते.
![]() |
| - Advertisement - |
या कार्यक्रमाला अनेक राजकीय, सामाजिक, व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये विकासरत्न मा. सरकारसाहेब रावल, बाजार समिती सभापती नारायण पाटील, गढीचे पुरोहित योगेश नगरदेवळेकर, स्वोध्दारक संस्थेचे सचिव सी. एन. राजपूत, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, जितू गिरासे, ललितसिंग गिरासे, माजी नगरसेवक संजय मराठे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, डी. एस. गिरासे, नथू वारुळे, विक्रम तायडे, नरेंद्र गिरासे, डी. एन. जाधव, संजय तावडे, ईश्वर धनगर, नरेंद्र कोळी, राजू धनगर, संदीप राजपूत, प्रमोद राजपूत, बी. बी. गिरासे, पंकज चौधरी, मनोज निकम, कृष्णा नगराळे, सचिन मराठे, सचिन सोनवणे, रवी पाटील, हरीश आव्हाड, अनिल सिसोदिया, नितीन कोळी यांच्यासह शहरातील विविध प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शतकानुशतके टिकलेली परंपरा
रावल गढीवरील होळी उत्सवाची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या परंपरेला स्थानिक लोक मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने पाठिंबा देतात.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत वारसा
रावल गढीवर साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवामुळे धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होत असून, पुढील पिढ्यांपर्यंत हा ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य उत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
- सैय्यद सानिल
(धुळे दर्पण)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



