धुळे दर्पण न्यूज :- शहराच्या दुरवस्थेबाबत शिवसेना नेते, माजी आमदार कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांचे संतापजनक पत्रक
धुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणारी तडफड, रस्त्यांवरील निकृष्ट दर्जाचे दिवे, कोट्यवधींचा भ्रष्टाचार, कचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार यावरून शहरातील लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अशा पार्श्वभूमीवर, धुळे महानगरपालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने नुकतीच संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्या अधिकाऱ्याने जाहीररित्या सांगितले की—
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
"माझी कोणीही बदली करू शकत नाही! हायकोर्ट वगैरे मी पाहून घेईन! माझ्या मागे स्वतः मुख्यमंत्री आहेत! मी अजून एक वर्ष येथेच राहणार आहे! जी काही कामे करून घ्यायची असतील, ती माझ्याकडे नव्या रेटने घेऊन या!"
या वक्तव्यावर संतप्त होत, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेत सरकार आणि प्रशासनातील भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल केला.
"धुळेकरांनो, आता फक्त परमेश्वरच तुमचे रक्षण करू शकतो!"
गोटे यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या प्रशासनात पुरुष अधिकारी असते तर, "कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले" असे म्हणता आले असते. पण सद्यस्थितीत भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महायुती सरकारच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात भ्रष्ट आणि बेशरम अधिकाऱ्यांची चलती आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तर ठेकेदाराला थेट सांगितले—
"टेंडर भरताना मोठ्या रकमेत बोली लावा, कारण आम्हालाही संसार आहे, मुलेबाळे आहेत!"
इतकंच नाही, तर हा अधिकारी नागरिकांना भेटताना त्यांचे मोबाईल फोन बाहेर ठेवण्यास सांगतो! स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत धुळेकरांनी इतकी नीतीभ्रष्ट, बेशरम आणि चारित्रहीन प्रशासकीय व्यवस्था कधीच पाहिली नव्हती.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
"भाजप सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात चालू न शकलेले, टाकाऊ आणि भ्रष्ट अधिकारी धुळ्यात आणले आहेत!"
अनिल गोटे यांनी असेही म्हटले की, हे अधिकारी कोण आहेत हे जनतेने आपल्या कल्पनाशक्तीने ठरवावे.
"या परिस्थितीत धुळेकरांना आता फक्त परमेश्वराचाच आधार आहे!"
— अनिल गोटे, माजी आमदार
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


