धुळे दर्पण न्यूज :- धुळे सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात कुणाल कामराच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार निषेध नोंदवला. तसेच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कामराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा आणि पुतळा दहन
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, नहानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवतीर्थ चौकात हा निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी ‘कुणाल कामरा मुर्दाबाद’, ‘शिंदे साहेबांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही’, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. यानंतर कामराच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून त्याच्या विधानांचा तीव्र निषेध करण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
युवा सेनेने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
शिवसेनेच्या आंदोलनानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुपूर्द केले. या निवेदनात कुणाल कामराने सातत्याने हिंदू धर्माचा आणि हिंदू नेत्यांचा अपमान केला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो जाणीवपूर्वक धार्मिक आणि राजकीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
युवा सेनेचे योगेश मराठे, प्रतीक शिंदे, अनिल ठाकूर, अमित खंडेलवाल, राकेश चव्हाण, चेतन धामेचा, शुभम पाटील, नितीन मराठे, देवेंद्र गायकवाड, कल्पेश येवले आदी कार्यकर्त्यांनी या वेळी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. "कुणाल कामराने केलेल्या विधानामुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे," असे मत या वेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.
भविष्यातील आंदोलनाचा इशारा
या संपूर्ण घटनेमुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून, कुणाल कामराच्या विधानावर वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. जर लवकरात लवकर कुणाल कामरावर कारवाई झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



