धुळे दर्पण न्यूज :- समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या विधानांमुळे वादग्रस्त ठरलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळे येथे तीव्र आंदोलन करत आझमी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून निषेध व्यक्त केला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

वक्तव्यामुळे संतप्त जनमानस, शिवसेनेची जोरदार मागणी

  शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप केला की, "आ. अबू आझमी सातत्याने जनतेच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करत आहेत. समाजात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे वक्तव्य ही समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे देशभरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत."


  या पार्श्वभूमीवर आझमींविरोधात कलम १२४ (ए) अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.


धुळे शहरात शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

  शिवसेनेच्या वतीने आज धुळे येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनोज मोरे आणि महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले.

  यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अबू आझमी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारला इशारा दिला की, "जर आझमी यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल."


शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी नेते आणि कार्यकर्ते

  या आंदोलनात संजय कुसळकर, मनोज कोळेकर, पवन शिंदे, राजेंद्र चौधरी, अक्षय भदाणे, मनोज घोडके, किरण पवार, दत्तू माळोदे, प्रवीण वाडलेकर, रवी शिंदे, आदेश मराठे, विजय झोतींगे, योगेश मराठे, केदार गुरव, मयूर कुलकर्णी, तेजस्विनी गोसावी, किरण आगलावे, भूषण पाटील, तनया जगताप, आकाश बैसाणे, करण गोसावी, भूषण पाटील, राजू लोंढे, हिना मेवानी, गणेश चौधरी, तुषार सैंदाने, संदीप खैरनार, आकाश बैसाने, मनोज कोळी, राजू बडगुजर, राहुल साळुंके, दीपक बडगुजर, कुणाल कुसळकर, वर्षा गांगुडे आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सरकारला इशारा – कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करू

  शिवसेनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले की, "जर अबू आझमी यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर शिवसेना राज्यभर आंदोलन छेडेल."


  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या या मुद्द्यावर आता शासन काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -