धुळे दर्पण न्यूज :- क्रूरकर्मा औरंगजेबाचे गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी, दिग्दर्शिका फराह खान आणि प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची पाकिस्तानात रवानगी करावी, अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली. प्रभादेवी परदेशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत हे मागणे लावून धरले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, भारतात राहून येथील लोकांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तींना येथे राहण्याचा अधिकार नाही. भारत हा सहिष्णुता आणि विविधतेसाठी ओळखला जातो, परंतु काही लोक आपल्या वक्तव्यांमधून समाजात तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
प्रयागराजच्या स्नानानंतर औरंगजेबाचे समर्थन?
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, नुकतेच प्रयागराज येथे तब्बल ६६ कोटी हिंदूंनी संगमात स्नान करून आध्यात्मिक परंपरा जपली. पण काही लोक असे आहेत, ज्यांना आपल्या इतिहासाची किंमत नाही आणि ते क्रूरकर्मा औरंगजेबाचे गुणगान करत आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी अनेक वेळा हिंदू परंपरांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता त्यांचे औरंगजेबप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.
![]() |
| - Advertisement - |
प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान हिने काही दिवसांपूर्वी होळी या हिंदू सणाला ‘छपरी’ (तिसऱ्या दर्जाचा) म्हणत अपमान केला. भारतीय संस्कृतीचा असा अवमान करणे मुळीच सहन केले जाणार नाही, असे इंदिरा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सलमान खानवरही गंभीर आरोप
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरही बिग बॉस या कार्यक्रमात हिंदू महिलांची अवहेलना केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर त्यांना महिलांचा आदर करायचा नसेल, तर त्यांनी आपल्या भगिनींना बिग बॉसच्या मंचावर आणून त्यांच्यावर तेच प्रयोग करून दाखवावेत, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
"भारतात कमवायचं आणि देशाविरोधात बोलायचं?"
निवेदनात असेही म्हटले आहे की, हे लोक भारतात राहून, इथून कोट्यवधी रुपये कमावून, भारतीय नागरिकांचा आदर न करता त्यांची खिल्ली उडवतात. जर या तिघांना भारतीय संस्कृतीबद्दल कणभरही आदर नसेल, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानला जावे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
देशद्रोहाचा गुन्हा आणि नागरिकत्व रद्द करण्याची मागणी
या शिष्टमंडळाने सरकारकडे मागणी केली की, अबू आजमी यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी, फराह खान आणि सलमान खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांचे भारतीय नागरिकत्व काढून टाकावे.
या आंदोलनात प्रभादेवी परदेशी, आशाताई पाटील, अमित बडगुजर, कुणाल तारगे, अमितकुमार बडगुजर, बजरंग बर्वे, ज्ञानेश्वर देव, बॉबी पाटील, किशोर भोई, निरंजन पाटील, भुषण पाटील आणि सुदाम शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही वक्तव्याचा कठोर विरोध केला जाईल आणि यापुढे अशा लोकांना सहन केले जाणार नाही, असा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


