धुळे दर्पण न्यूज :- हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने शोभायात्रा काढण्याचे आवाहन आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी केले आहे. भगवान श्रीरामांचे अयोध्या नगरीत आगमन झाले होते, त्याच दिवशी हिंदू धर्मीय आपापल्या घरी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करतात. याच परंपरेला अनुसरून, नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यासाठी आणि भावी पिढीला सनातन धर्माची ओळख करून देण्यासाठी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
पत्रपरिषदेत सर्वपक्षीय उपस्थिती
हॉटेल स्ट्रीट स्पाईस येथे आयोजित पत्रपरिषदेत विविध पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामण गवळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज करनकाळ, कैलास चौधरी, हिलाल माळी, योगीराज मराठे, विजय पाच्छापूरकर, मुन्ना अग्रवाल, माजी महापौर प्रदीप कर्पे, उमेश चौधरी, भरत देवळे, निफाडकर गुरूजी, सुभाष कांकरिया, नाना महाराज हलोर, लोकेश चौधरी, सचिन मराठे, मयूर सूर्यवंशी, महेंद्र विसपूते, राकेश संचेती, अमोल जाधव आणि समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
रविवार, ३० मार्च रोजी हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून, मागील वर्षीपासून शोभायात्रेच्या मार्गात काही बदल करण्यात आला आहे.
शोभायात्रेचा मार्ग आणि प्रमुख उपस्थिती
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ही भव्य शोभायात्रा देवपूर येथील खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर येथून सकाळी ८ वाजता सुरू होईल. त्यानंतर यात्रा फुलवाला चौकातील श्रीराम मंदिर येथे पोहोचेल आणि तेथे आरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात येईल. यात्रेत विविध संत-महंतांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये संतश्रेष्ठ शांती कामना एकनाथ महाराज (पैठण) यांचे बारावे वंशज हभप योगेश महाराज गोसावी (पालखीवाले, पैठण), प्रमुखस्वामी महाराज आनंद जीवनदासजी स्वामी, तसेच प्रमुख कोठारी महंत स्वामी नारायण मंदिर यांचा समावेश आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शोभायात्रेचे विशेष आकर्षण
शोभायात्रेत विविध ढोल-ताशा पथके, जिवंत देखावे आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संविधान प्रतिकृती, अहिल्याबाई होळकर यांचा जिवंत देखावा, तसेच विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. असंख्य तरुण-तरुणी यात भाग घेऊन आपली कला आणि श्रद्धा व्यक्त करणार आहेत.
या भव्य शोभायात्रेत संपूर्ण हिंदू समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सनातन धर्माचा गौरव वाढवावा, असे भावनिक आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


