धुळे दर्पण न्यूज :- रोटरी क्लब ऑफ धुळे, रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे व कस्तुरबा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात उद्या, दिनांक ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील राजवाडे मंडळाजवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे 'समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहॅब सेंटर' चा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमाचा लाभ गरजू रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. निखील पवार यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
पत्रपरिषदेला रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश अग्रवाल, राहुल कुलकर्णी, आशिष अग्रवाल, राहुल गांधी, डॉ. निखील पवार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. निखील पवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या रिहॅब सेंटरमध्ये ० ते १८ वयोगटातील न्यूरोलॉजिकल तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांसाठी संपूर्ण पुनर्वसन सेवा पुरवली जाणार आहे. हे सेंटर शहरातील राजवाडे मंडळाजवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे चार खोल्यांमध्ये कार्यरत असेल. येथे थेरपी आणि उपचार सेवा मोफत किंवा सुलभ दरात उपलब्ध होणार आहे.
रिहॅब सेंटरमध्ये उपलब्ध सेवा:
* ऑक्युपेशनल थेरपी
* संवेदी एकत्रीकरण
* स्पीच थेरपी
* श्रवणशक्ती विभाग
* वर्तन समस्या उपचार
* क्लिनिकल मानसोपचार
* सुधारात्मक शिक्षण आणि पालक समुपदेशन
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मुंबई, पुणे, नाशिक नंतर आता धुळे शहरात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने या सुविधेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या रिहॅब सेंटरमध्ये उपचारासाठी आवश्यक साहित्य पुणे येथून प्राप्त झाले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी संचालनासाठी रोजचा खर्च सुमारे ११ हजार रुपये आहे. त्यामुळे समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी दरवर्षी ११ हजार रुपये देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील डॉ. निखील पवार यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

