धुळे दर्पण न्यूज : मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईद सणानिमित्त धुळे शहरात प्रथमच मारिया हॉल, १०० फुटी रोड येथे भव्य "मारिया मेला" आयोजित करण्यात आला आहे. या मेल्याला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्साहपूर्ण वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

पाच दिवसांचा भव्य उत्सव
  या मारिया मेल्याचे आयोजन रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असून, मेला सलग पाच दिवस चालणार आहे. मेल्यात विविध प्रकारचे मनोरंजनाचे साधन आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची रेलचेल पाहायला मिळत आहे. या मेल्यात मोठ्या झुल्यांसह ब्रेकडान्स, नाव, करासेल, तसेच लहान मुलांसाठी खास चक्री, जंपिंग जॅक, बॉन्सी यांसारखे आकर्षक पाळणे लावण्यात आले आहेत.

खाद्यपदार्थांचा मेजवानीचा आस्वाद
  मेल्यात खाद्यप्रेमींसाठी खास स्टॉल्स सजवण्यात आले आहेत. ईदच्या निमित्ताने विविध पारंपरिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. कबाब, बिर्याणी, शवरमा, फिरनी, हलवा पराठा, तसेच फास्ट फूडचे वेगवेगळे प्रकार येथे उपलब्ध आहेत.
- Advertisement -
कुटुंबांसाठी आनंदाचे क्षण
  संध्याकाळी मेल्यात गर्दीचा उत्साह अधिक वाढत असून, कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या आकर्षणामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होत आहे. नागरिक आपल्या परिवारासह मेळ्याचा आनंद घेत आहेत.

आयोजकांकडून आवाहन
  मेल्याच्या आयोजकांच्या वतीने तमाम धुळेकर नागरिकांना या मेल्याला भेट देऊन आपल्या कुटुंबासह रमजान ईदचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

"रमजान ईद हा सण बंधुत्वाचा संदेश देतो. या मेल्याच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र येऊन सणाचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे. धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा," असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

नागरिकांचा उत्साह व कुटुंबीयांसोबत आनंद घेण्यासाठी सजलेला हा मेला शहरवासीयांच्या रमजान ईद सणाला खास रंगत देत आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -