Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
काय आहे प्रकरण?
साक्री पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता सुलतान मन्सुरी याने त्याच्या ‘रॉकी-००९’ या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल आणि समाजातील एकोपा टिकण्यास बाधा येईल, अशा स्वरूपाचा मजकूर पोस्ट केला. या मजकुरासोबत त्याने औरंगजेबसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो असलेले स्टेटस ठेवले होते.
![]() |
| - Advertisement - |
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी साक्री पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर कोणताही वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट करण्याचे टाळावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
![]() |
| - Advertisement - |
धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही भडकावू पोस्ट शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या पोस्ट कोणी करत असल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
(धुळे दर्पणसाठी सैय्यद सानिल)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



