धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात राजकीय वातावरण तापले असताना माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला करण्याचे कटकारस्थान रचले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार गोटे म्हणाले, "मी सातत्याने प्रशासन व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आवाज उठवत आहे. यामुळेच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता आहे."
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
गोटे यांनी पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप करत सांगितले की, "स्वतःच्या नावावर एकही चौरस फूट जमीन नसताना बनावट दस्तऐवज तयार करून पालकमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी २ कोटी ६५ लाख रुपये लाटले आहेत."
भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा?
गोटे यांनी असा दावाही केला की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत धुळे शहरात राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी "बीड पॅटर्न" लागू करण्याचा विचार झाला आहे. या पद्धतीने आपल्याला संपवण्यासाठी कट रचला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
![]() |
| - Advertisement - |
"माझ्या आयुष्यात मी कधीही धमक्यांना भीक घातली नाही. सत्यासाठी लढण्याचा निश्चय केला आहे." असे ठाम मत माजी आमदार गोटे यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, संपर्कप्रमुख अशोक धात्रक, नरेंद्र परदेशी आणि तेजस गोटे उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मुद्दाम लक्ष्य केलं जातंय?
गोटे यांनी यापूर्वीही प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यामुळेच त्यांना त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले. "मी ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी मागितली, ती दडपून टाकण्यासाठी मला लक्ष्य केलं जातंय."
पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा विचार
गोटे यांनी सांगितले की, "जर माझ्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांवर कोणताही हल्ला झाला, तर त्याला थेट पालकमंत्री जबाबदार असतील." ते लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


