धुळे, दि. 26 एप्रिल 2025

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात दोन तरुणांमध्ये पूर्वीच्या वादावरून वाद वाढत जाऊन एकाने दुसऱ्यावर दंड्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणाने धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधितावर असंज्ञेय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  तक्रारदार मुबशिर अकरम अली सैय्यद (वय २३), व्यवसायाने ग्राफिक डिझायनर, रा. प्लॉट नं. २२, मुस्लिम नगर, नॅशनल उर्दू हायस्कूलजवळ, धुळे, यांनी दिलेल्या माहितीवरून असे समजते की, ते आपल्या कुटुंबासह वरील ठिकाणी राहतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतात.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  तक्रारीनुसार, दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास, मुबशिर सैय्यद हे मित्रासोबत हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना, पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून आरोपी तबरेज खान नूर खान (रा. सार्वजनिक हॉस्पिटल, गरीब नवाज नगर, कुबा मशिद जवळ, धुळे) याने त्याच्या दुचाकीला बांधलेल्या दंड्याने मुबशिरच्या डाव्या हातावर जोरदार मार केला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत पीडिताला जिवे मारण्याची धमकी देखील दिली.


  ही घटना घडल्यानंतर पीडित मुबशिर सैय्यद यांनी तातडीने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर घटनेची दखल घेत बी.एन.एस. २०२३ मधील कलम ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत असंज्ञेय गुन्ह्याची नोंद करून तपास सुरु केला आहे.