धुळे दर्पण न्यूज:- मनमाड जीन, नटराज टॉकीज परिसरातील हजारो रहिवाशांच्या घरांची जमीन वक्फ बोर्डाकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही महिन्यांपासून सुरू होता. या प्रकरणावर जोरदार आवाज उठवत वक्फ बोर्ड संघर्ष समितीने सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. संघर्ष समितीच्या या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रमुख नेत्यांचा सत्कार आज एका भव्य कार्यक्रमात करण्यात आला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल आणि धुळे शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांचा वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला. वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता व भय निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सदर नेत्यांनी शासन दरबारी संघर्ष समितीच्या मागण्यांचा ठामपणे पाठपुरावा करत धुळेकरांना दिलासा दिला.
![]() |
| - Advertisement - |
समितीचे अध्यक्ष प्रदीप कर्पे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "ही केवळ जमीन वाचवण्याची लढाई नाही, तर हजारो नागरिकांच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्न आहे. आम्ही या लढ्यात कधीही मागे हटणार नाही. सरकारनेही आमच्या भावना समजून घेत न्याय द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने संघर्ष समितीच्या लढ्याला एक नवे बळ मिळाले असून, भविष्यातही ही समिती जनतेच्या हक्कांसाठी एकवटून कार्यरत राहील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


