धुळे दर्पण न्यूज :- शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विकासानुसार वाढत्या वीज मागणीची गरज ओळखून, आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी महावितरण तसेच शासन स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले आहे. 'निरंतर वीज योजना' अंतर्गत धुळे शहरात प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असून, वीज समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  धुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालेला असून, नवीन वसाहती, औद्योगिक क्षेत्र (एम.आय.डी.सी.) यांसह नागरिकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी अखंड वीज पुरवठा अनिवार्य आहे. ही बाब लक्षात घेता आमदार अग्रवाल यांनी या विषयात लक्ष घालून, थेट राज्याच्या ऊर्जामंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली. या भेटीत सचिव व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


  बैठकीत धुळे शहरातील व एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठ्याशी संबंधित अडचणी, जूने व क्षमतेपेक्षा कमी असलेले रोहित्रे, वीज ट्रान्सफॉर्मरची निकड यावर सखोल चर्चा झाली. यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिले होते. या बैठकीत ठरवलेले निर्णय आता प्रत्यक्षात उतरवले जात आहेत.

- Advertisement -
  या योजनेचा प्रारंभ वलवाडी शिवार येथून करण्यात आला असून, तेथे जुन्या २५ के.व्ही. क्षमतेच्या रोहित्राऐवजी १०० के.व्ही. क्षमतेचे नवीन रोहित्र बसवण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आता अधिक स्थिर आणि अखंड वीजपुरवठा मिळणार आहे. या शिवाय शहरातील इतर ठिकाणीही अशा प्रकारची कामे सुरू असून ती प्रगतीपथावर आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  धुळेच्या सर्वांगीण विकासासाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे काम मार्गी लावले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच उद्योजकतेच्या वाढीसाठी ही पायाभूत सुविधा अत्यंत मोलाची ठरणार आहे.


  शहरवासीयांचा विश्वास आणि पाठिंबा हेच आमचे बळ असून, धुळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, असे आमदार अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -