धुळे दर्पण न्यूज:- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंता पसरली होती. मात्र, धुळे जिल्ह्यातील एकही पर्यटक या हल्ल्यात बाधित नसल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. राज्य शासनाने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयात राज्य नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून, जिल्हा पातळीवरही धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
राज्य नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या पर्यटकांच्या यादीच्या आधारे धुळे जिल्ह्यातील कोणताही पर्यटक सध्या पहलगाममध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील कोणताही अनुचित प्रसंग घडल्यास तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासन सतर्क असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
![]() |
| - Advertisement - |
श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, पर्यटक व त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
• दूरध्वनी क्रमांक: 0194-2463651 / 2457543
• व्हॉट्सॲप क्रमांक: 7780805144 / 7780938397
मुंबईतील राज्य नियंत्रण कक्ष:
• दूरध्वनी क्रमांक: 022-22027990 / 22794229
• भ्रमणध्वनी क्रमांक: 9321587143
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे जिल्हा नियंत्रण कक्ष:
• दूरध्वनी क्रमांक: 02562-288066
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जितेंद्र सोनवणे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक: 8698862890 / 8788762871
धुळे जिल्ह्यातील नागरिक तसेच काश्मीरमध्ये असलेले पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणतीही मदत आवश्यक असल्यास वरील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. प्रशासन पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


