धुळे दर्पण न्यूज :- जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धुळे येथील शिवतीर्थवरील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि पाकिस्तानचा ध्वज जाळून संतप्त घोषणाबाजी करण्यात आली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या वेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. जमलेल्या शिवसैनिकांनी 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'दहशतवादाचा निषेध असो' अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडलं.
![]() |
| - Advertisement - |
या यात्रेच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करून हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेने केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
१९९६ मध्येही अमरनाथ यात्रेला धोका निर्माण झाला असताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "अमरनाथ यात्रेकरूंना जराही इजा झाली, तर हज यात्रेसाठी एकही विमान देशातून जाणार नाही" अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यामुळे यात्रा सुरळीत पार पडली होती. आजही तशीच ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या निषेध कार्यक्रमात शिवसेना उपनेते सौ. शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करणकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, भरत मोरे, ललित माळी, विजय वाघ, संदीप सूर्यवंशी, निंबाजी मराठे, जवाहर पाटील, संजय पाटील, शेखर वाघ, रामदास कानकाटे, डॉ. अनिल पाटील, चिलू आवळकंठे, कपिल लिंगायत, महादू गवळी, आनंद जावडेकर, दिनेश पाटील, पंकज भारस्कर, सुनील चौधरी, निलेश कांजरेकर, विष्णू जावडेकर, पिनू सूर्यवंशी, अजय चौधरी, हिमांशू परदेशी, योगेश पाटील, डॉ. सोमनाथ चौधरी, चंद्रकांत हजारे, पिंटू ठाकूर, अनिल चौधरी, वैभव पाटील, नितीन देशमुख, तेजस सपकाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


