धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. गुलमोहर येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षण विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांशी संवाद बैठक पार पडली. या बैठकीस आमदार मंजुळाताई गावित, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर आदी अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शिक्षणमंत्री भुसे म्हणाले, "राज्यातील विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी किमान २५ टक्के पटसंख्या वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे."
भौतिक व शैक्षणिक सुविधा अद्ययावत करण्याचा आग्रह
विद्यार्थ्यांना चांगल्या इमारती, स्वच्छ व खेळती वर्गखोली, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष या भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्मार्ट बोर्ड, ऑनलाइन शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही त्यांनी सुचवले. शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघाच्या नियमित बैठका घेण्याचे निर्देश दिले.
माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, सीबीएसई पॅटर्नची तयारी
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग शाळा विकासात घ्यावा. त्यांच्या यशोगाथांचा उपयोग नव्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी करावा. नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिलीतून सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून, सर्व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
जूनच्या पहिल्या आठवड्यात गावागावात जाऊन पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत उपक्रमांनी करावे. देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करावा. शालेय शिक्षणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत राखीव ५ टक्के निधीतून विविध कामे हाती घेण्यात यावीत.
आरोग्य तपासणी व सहलींचीही योजना
प्रत्येक विद्यार्थ्याची नियमित आरोग्य तपासणी करावी व आरोग्य पत्रिका तयार करावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीतून बँक, दवाखाना, दुकान, शासकीय कार्यालये यांची भेट देण्यात यावी. तसेच इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकविणे सक्तीचे करावे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करणार
"यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी केली जातील. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये स्नेहसंमेलन आणि बालक-पालक मेळावा बंधनकारक असेल," असे भुसे यांनी सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना
तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा, मुलींसाठी सायकल वाटप, आठवीच्या पुढील वर्गांसाठी 'पिंक रूम', ४ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच दररोज अर्धा तास 'विद्यार्थ्यांशी संवाद' हा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
जनप्रतिनिधींनीही पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, अशी सूचना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |

