धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील नंदी रोडवर मध्यरात्री घडलेली एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. एका किरकोळ कारणावरून – गाडीचा डॅश लागल्याच्या कारणावरून – दोन अनोळखी इसमांनी १८ वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

मयत तरुणाची ओळख व हत्येची पार्श्वभूमी

  मच्छीबाजार, निशात चौक, धुळे येथील रहिवासी फैज अहमद मुराद हुसैन अन्सारी (वय १८) हा तरुण काल दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री सुमारास आपल्या कामानिमित्त नंदी रोडवरील एनर जिमच्या जवळून जात होता. त्याच वेळी एका दुचाकीचा डॅश (धक्का) लागल्याच्या कारणावरून त्याची दोन अनोळखी इसमांशी बाचाबाची झाली.


  बोलाचालीचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर त्या दोघांनी फैज याच्यावर बेदम हल्ला केला. हाताबुक्यांनी तसेच लाथांनी छाती व पोटावर मारहाण केली. त्यानंतर संतप्त अवस्थेत आणि ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी फैज याचे दोन्ही हात पकडून त्याचे डोके सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या रस्त्यावर तब्बल ५ ते ६ वेळा जोरात आदळले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -
पोलिसांचा तपास व पुढील कारवाई

  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, पोलिस निरीक्षक सुरेश घुसर, तसेच पोसई हरिशचंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी करून आवश्यक ती कारवाई सुरू केली.


  मयताचा भाऊ मोहमद साजिद अब्दुस लतीफ अन्सारी यांनी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दोन इसमांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे.


धुळेकरांनी काय शिकावे?

  सार्वजनिक ठिकाणी किरकोळ वादांवरून जीवे मारण्याच्या घटना समाजासाठी अत्यंत घातक आणि चिंताजनक आहेत. पोलिस प्रशासनाने तत्काळ गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.


धुळे दर्पण आपल्या वाचकांना आवाहन करतो की,  कुठल्याही वादाला हिंसक वळण लागू नये, यासाठी संयम राखा, आणि गरज भासल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.


– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -