धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील मालमत्ता धारकांसाठी महापालिकेकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. संगणकीकरण प्रक्रियेमुळे उशिराने सुरू झालेल्या कर आकारणीमुळे नागरिकांना मिळू न शकलेल्या सवलतींची भरपाई म्हणून महापालिका प्रशासनाने १ मे २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत मालमत्ता कराच्या चालू वर्षाच्या (आर्थिक वर्ष २०२५-२६) बिलांवर १० टक्के सवलत जाहीर केली आहे. ही माहिती आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी मालमत्ता कराचा दर ३६ टक्के होता, तो आता ३० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना ६ टक्के दरकपात आणि वरील १० टक्के सूट मिळून एकूण १६ टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. ही योजना शहरातील तसेच हद्दवाढ भागातील मालमत्ता धारकांनाही लागू असणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
महापालिकेच्या अहवालानुसार, नवीन सर्वेक्षणानंतर धुळे शहर व हद्दवाढ भागातील मालमत्तांची संख्या १,१३,८०१ इतकी झाली आहे. यामध्ये ११ कोटी ३४ लाख रुपयांचा महसूल घट झाला असून, सध्याचे बिलांकन ७१ कोटी २१ लाखांवर येऊन पोहोचले आहे. याआधीच्या ७७,५३७ मालमत्तांवर २५ कोटी ९९ लाखांचे बिल होते. नवीन सर्वेक्षणानंतर ही संख्या ४६,०२५ झाली असून, त्यावर १९ कोटी ३४ लाखांचे बिल आकारण्यात आले आहे, जे १० कोटी ३० लाखांनी कमी झाले आहे.
याशिवाय, महापालिकेने जाहीर केले आहे की शनिवार आणि रविवार देखील कर भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत, जेणेकरून नागरिक वेळेत आपले कर भरू शकतील. यासोबतच, खुले भूखंडधारकांवरही आता कर आकारणी केली जाणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महापालिकेचे आवाहन :
महापालिकेने सर्व नागरिकांना या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही ‘शास्ती माफी योजना’ फक्त ३१ मे २०२५ पर्यंत लागू असून, त्यानंतर नियमित दरांप्रमाणे कर आकारणी करण्यात येणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

