धुळे दर्पण न्यूज :- जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि एक शासकीय नोकरी देण्यात येणार आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करत त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि पुर्नवसनाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून सरकारने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
असावरी जगदाळेंना मिळाली सरकारी नोकरी
पुण्यातील संतोष जगदाळे हे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या कन्या असावरी जगदाळे यांना यापूर्वी डी वाय पाटील संस्थेत नोकरी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, आता त्यांना थेट शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असावरी यांनी कॉम्प्युटर सायन्समधून बीएससी, एमबीए, आणि लेबर लॉमध्ये डिप्लोमा केलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेषाधिकार वापरत हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
![]() |
| - Advertisement - |
महाराष्ट्रातील मृतांची नावे
1. अतुल मोने - डोंबिवली
2. संजय लेले - डोंबिवली
3. हेमंत जोशी - डोंबिवली
4. संतोष जगदाळे - पुणे
5. कौस्तुभ गणबोटे - पुणे
6. दिलीप देसले - पनवेल
या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदतीचे हात पुढे करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यातील अंधारलेल्या क्षणांना काहीसा दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया
या निर्णयाचे सामाजिक क्षेत्रात सकारात्मक स्वागत झाले आहे. "नुकसान भरून निघणार नाही, पण या निर्णयामुळे आमच्या कुटुंबाला आधार मिळेल," असे संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांनी सांगितले. या निर्णयामुळे शासकीय जबाबदारीची जाणीव अधोरेखित झाली असून, संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे आहे हे अधोरेखित झाले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

