धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहराच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या भाग्यश्री विसपुते यांचे आज ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षातर्फे औपचारिक स्वागत करण्यात आले. या वेळी विविध सामाजिक आणि स्थानिक मुद्द्यांवर AIMIM शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
![]() |
| - Advertisement - |
या शिष्टमंडळात AIMIM युवा नेते शहबाज शहा यांनी जिल्हाधिकारी समोर जनावरांच्या बेधडक धरपकडीचा निषेध व्यक्त केला. येणाऱ्या ईद-उल-अजहा सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाला कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने कुरबानीचे धार्मिक कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी पोलीस आणि प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
तसेच, एटा भट्टी (देवपूर) परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईवर त्वरित प्रतिबंध घालावा आणि प्रभावित नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रतिनिधी मंडळात AIMIM चे जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, शहराध्यक्ष मुख्तार बिल्डर, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, माजी नगरसेवक साजिद सई, माजी नगरसेवक आमीर पठाण, युवा नेते शहबाज शहा आणि मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हलीम शम्सुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
AIMIM च्या या पुढाकारामुळे प्रशासनाशी संवादाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.


