धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात बनावट नोटा कमी किमतीत देण्याच्या आमिषावर नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ड्रॉप केस’ पद्धतीने फसवणूक करणाऱ्या या रॅकेटविरोधात धुळे तालुका व निजामपूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण २५ संशयितांची नावे समोर आली असून त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या टोळीतील सदस्य सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून, ‘बनावट नोटा’, ‘स्वस्तात सोने व तांब्याची तार’ यासारख्या आकर्षक जाहिराती तयार करायचे. अशा जाहिरातींना बळी पडलेल्या नागरिकांना विशिष्ट ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.


  या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. सायबर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संबंधित बनावट अकाऊंट्सचा शोध घेतला आणि त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली.

- Advertisement -
  धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २७९/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता ३१८(४), ६२, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ८४ (उ), ६६ (ऊ) अंतर्गत पाच सोशल मीडिया अकाऊंट धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर निजामपूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे क्रमांक १२७ व १२८/२०२५ दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एकूण १८ अकाऊंट धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.


  संशयितांची यादी: शंतनू राजूलाल पवार, जयदेव पवार, अर्चना भोसले, जंजीबाई साहेबराव चव्हाण, रंजूबाई चतुर पवार, सचिन पवार, प्रिया पवार, सुमिता चव्हाण, आनंदा पवार, श्याम पवार, कैलास चव्हाण, योगेश्वर चव्हाण, साहिल चव्हाण, मीराबाई पवार, साहिल पवार, मालतीबाई चव्हाण, अरविंद पवार, अमेश पवार, अहिल्याबाई पवार, चंद्रभागा भोसले, परशीलाल भोसले, पाणीलाल चव्हाण, सकूबाई ठाकरे, सर्वनाथ चौरे, तिखाबाई चव्हाण.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या प्रकरणी नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांकडून जनजागृती सुरू आहे. अजनाळे, कुसुंबा, जामदा, टिटाणे, हॅकळवाडी, निजामपूर या प्रभाव क्षेत्रांत डिजिटल बॅनरद्वारे तसेच सोशल मीडियावर जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत.

- Advertisement -

  पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, परिमंडळीय पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तपासात सहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोनि श्रीराम पवार, पोनि अभिषेक पाटील, सपोनि मयूर भामरे, पोउनि प्रतिक कोळी, पोहेकॉ भुषण खलाणेकर, पोकॉ विवेक बिलाडे, पोकॉ हेमंत बागले, पोकॉ चेतन सोनगिरे यांचा समावेश होता.


  पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या बनावट जाहिराती आढळल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कोणत्याही अमिषाला बळी न पडता जागरूक राहावे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -