धुळे दर्पण न्यूज :- धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांची खरेदी-विक्री करताना आता कोणतेही जनावर 'इअर टॅग' शिवाय स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार, ही अट बंधनकारक करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  श्री. पाटील यांनी सांगितले की, "शासनाच्या निर्देशानुसार बाजार समितीच्या हद्दीत विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक जनावराच्या कानाला १२ अंकी 'ईअर टॅग' (बिल्ला) असणे गरजेचे आहे. हा टॅग ऑनलाईन पद्धतीने नोंदवला गेला पाहिजे. यासाठी पशुपालकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी पूर्ण करावी. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून जनावरांच्या ओळखीची खात्री करण्यासाठी उपयुक्त आहे."


पशुवैद्यकीय दवाखान्यातूनच 'ईअर टॅग' उपलब्ध

  ईअर टॅग मिळवण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा लागणार असून, तिथेच नोंदणी करून टॅग लावण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरीही अनेक पशुपालक व व्यापारी या अटीकडे दुर्लक्ष करत असल्याचे निरीक्षण असून, त्यामुळे बाजार समितीकडून आता यासंदर्भात कठोर भूमिका घेतली जात आहे.

- Advertisement -
कडक अंमलबजावणीची तयारी

  "आता यापुढे कोणतेही जनावर इअर टॅगशिवाय बाजार समितीत विक्रीसाठी स्वीकारले जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावे", असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.


जनावरांच्या सुरक्षेचा दृष्टिकोन

  ईअर टॅगमुळे जनावरांची ओळख, मूळ मालक, वयोगट, आरोग्याची माहिती आणि स्थानिक हद्दीतील वाहतूक यावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे चोरी, तस्करी, तसेच पशूंच्या आरोग्याशी संबंधित माहिती गोळा करण्यास मदत होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची सूचना :

• ईअर टॅगशिवाय कोणतेही जनावर बाजारात विक्रीसाठी आणू नये.


• ईअर टॅगसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.


• आधार व मोबाईल नंबरसह नोंदणी करावी.


• नियम मोडल्यास कारवाई होऊ शकते.

- Advertisement -

  धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जनतेस कळविण्यात आले आहे की, ही प्रक्रिया जनावरांचे हक्क आणि सुरक्षा जपण्यासाठी आहे. त्यामुळे सर्व शेतकरी, व्यापारी व पशुपालकांनी समाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन नियमांचे पालन करावे, हीच अपेक्षा आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -