धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहातील सापडलेल्या रोकड प्रकरणामुळे गाजत असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीचा तिसरा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या बैठकीत आदिवासी विभागाशी संबंधित समस्या, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम आणि इतर मूलभूत सुविधा यावर सखोल चर्चा झाली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
सदर बैठकीत समितीने आदिवासी भागांतील अन्याय दूर करण्यावर भर दिला असून, प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती यासारख्या मुद्द्यांवर उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. समितीने विकासकामांमध्ये गती आणण्याची गरज अधोरेखित केली.
![]() |
| - Advertisement - |
अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये तीनही दिवसांत आम्ही अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासींसाठीच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाशी थेट संवाद साधला.”
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी काही गावांच्या ठिकाणी थेट दौरे करून नागरिकांचे म्हणणे ऐकले आणि त्यावर उपाययोजना सुचविल्या.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
विश्रामगृहातील सापडलेल्या रोकड प्रकरणामुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता, समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. मात्र, त्या प्रकरणाचा समितीच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.
समितीच्या या दौऱ्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासनाला एक सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः आदिवासी विकासाच्या दृष्टीने ही बैठक एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |

