धुळे दर्पण न्यूज :- दोंडाईच्याजवळील बाम्हणे गावात एका व्यावसायिकाला चाकूने जखमी करत पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे स्थानिक नेते कामराज निकम आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामराज निकम यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही मुलं फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
प्रकरण काय आहे?
बॅनर प्रिंटिंगचा व्यवसाय करणारे राहुल नंदकुमार पाटील (वय २७) यांनी दोंडाईचा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आणि त्यांच्या भागीदाराने – राहुल दिलीप पाटील – बाम्हणे शिवारात प्रताप कोळी यांच्या शेतात हॉटेल सुरू करण्याचे काम सुरू केले होते. हॉटेलसाठी आवश्यक पाण्याचा नळ कनेक्शन ग्रामपंचायतीकडे अर्ज करून घेतले होते.
![]() |
| - Advertisement - |
मंगळवारी दुपारी हे कनेक्शन घेतल्यानंतर रात्री सुमारे ९ वाजता दोन्ही राहुल पाटील लंघाणे रोडवर बोलत असताना प्रताप कोळी यांचा फोन आला आणि त्यांनी नळाचा व्हॉल्व्ह कोणी तरी तोडल्याचे सांगितले. त्यानंतर कामराज निकम आणि त्यांचे दोन मुलं – स्वप्निल आणि वैभव – घटनास्थळी आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
हल्ला आणि धमकी
त्यांनी दोन्ही राहुल पाटील यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर कामराज निकम यांनी राहुल नंदकुमार पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला. शिवाय, पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर राहुलच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. स्थानिक नागरिकांनी धाव घेतल्याने दोन्ही पीडितांची सुटका झाली.
![]() |
| - Advertisement - |
पोलीस तपास सुरु
या प्रकरणावरून कामराज निकम आणि त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. कामराज निकम यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, स्वप्निल आणि वैभव हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
(स्रोत: दोंडाईचा )
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


