धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील कुसुंबा परिसरात एका वृद्ध शेतकऱ्याची चक्क पोलिस असल्याचा बनाव करून फसवणूक करण्यात आली. या घटनेत भामट्याने वृद्धाकडील सोन्याची साखळी व अंगठी लांबवली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील ७७ वर्षीय शेतकरी नारायण दगडू शिंदे हे आपल्या शेताकडे चालले असताना गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवले. स्वत:ला पोलिस असल्याचे भासवत त्या व्यक्तीने सांगितले की, "या रस्त्यावर लूट करणारी टोळी सक्रिय आहे, त्यामुळे तुमच्याकडील दागिने सुरक्षिततेसाठी काढून माझ्याकडे द्या."
शिंदे यांनी भीतीपोटी आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि बोटातील अंगठी काढून त्या व्यक्तीकडे दिली. भामट्याने ते दागिने एका कागदात गुंडाळून ठेवायला सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर शिंदे यांनी कागद उघडून पाहिला असता त्यात दगड दिसून आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकारामुळे कुसुंबा, अजनाळे, हेकळवाडी या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवून अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. मात्र आता चक्क पोलिस असल्याचा सोंग घेत लुटमार सुरू झाल्यामुळे या टोळीचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
---
![]() |
| - Advertisement - |
जनतेस आवाहन:
* कोणतीही शासकीय ओळख न देता दागिने किंवा रोख रक्कम मागणाऱ्यांपासून सावध राहा.
* तत्काळ पोलिसांना माहिती द्या.
* अशा घटनांची माहिती १०० किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात द्या.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



