धुळे | दि. ३ मे २०२५

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पंढरपूर (जि. सोलापूर) येथून आलेल्या दोघा संशयित गुन्हेगारांना गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मलीक रियान हुसेन मुलाणी (वय २६) व रितेश संतोष लोहार, दोघेही राहणार उमरगाव, ता. पंढरपूर, हे गावठी बनावटीचा कट्टा बाळगत नगावबारीजवळील साईकिशन हॉटेल परिसरात थांबले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  त्यानंतर या दोघांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेण्यात आली. तपासणी दरम्यान मलीक रियान याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल (कट्टा), वनप्लस कंपनीचा मोबाईल मिळाला. तर रितेश लोहारच्या पँटच्या खिशातून दोन जिवंत काडतूस व विवो कंपनीचा मोबाईल आढळून आला.

- Advertisement -


  जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये स्टील बॉडी असलेला गावठी कट्टा (किंमत अंदाजे ३०,०००/-), दोन काडतूस (प्रत्येकी २,०००/-), वनप्लस मोबाईल (२५,०००/-) व विवो मोबाईल (२०,०००/-) असा एकूण ७७,०००/- रुपये किमतीचा माल समाविष्ट आहे.


  सदर कट्टा व काडतूस याबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ३/२५ नुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येत आहे.

- Advertisement -

  ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई प्रकाश पाटील, पोहेको पवन गवळी, आरीफ पठाण, सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, देवेंद्र ठाकूर व मयूर पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम