धुळे दर्पण न्यूज :- शहर वाहतूक शाखेमध्ये साचून ठेवलेले जिर्ण, खराब व निरुपयोगी साहित्य अखेर लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहे. ५ मे २०२५ रोजी सकाळी हा लिलाव होणार असून, इच्छुक नागरिकांनी वेळेत नोंदणी करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कोते यांनी केले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
लिलाव प्रक्रियेसाठी ठेवण्यात आलेल्या साहित्यामध्ये गॅस बत्त्या, लाकडी लहान साईज कपाट, लोखंडी व लाकडी रॅक, रंगीत दुरदर्शन संच, स्टीलचा मोठा पाणी टिप, जुन्या प्रकारचे प्रिन्टर, यु.पी.एस., सोनी कॅमेरा, ब्रेथ अॅनालाझर यंत्र, प्लॉस्टीकच्या खुर्च्या, लाकडी पलंग, बेडसिटसह पाच गाद्या आणि निर्लेखन मंजुरीचे विविध साहित्य समाविष्ट आहे.
![]() |
| - Advertisement - |
हे सर्व साहित्य लाकडी, प्लास्टिक, स्टील व इलेक्ट्रीक प्रकारांतील असून ते बंद स्थितीतील आहे. संबंधित यादी शहर वाहतूक शाखेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रत्यक्ष पाहणी करून नागरिक लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.
नोंदणीसाठी इच्छुक व्यक्तींनी लिलावाच्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी सकाळी शहर वाहतुक शाखा, धुळे येथे उपस्थित राहावे. एकदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नंतर आलेल्या व्यक्तींचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही विक्री प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून, वापरात नसलेल्या शासकीय मालमत्तेचा योग्य वापर व जागेचा पुनर्वापर हाच यामागचा उद्देश असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


