धुळे दर्पण न्यूज :-  पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकी जन्मोत्सवानिमित्त संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज उन्नती मंडळ, धुळे यांच्या वतीने मार्केट यार्ड परिसरातील पवन नगर येथे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

  कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल रामदास चौधरी, कॉम्रेड पोपटराव डोंगर चौधरी, श्री. अंकुश बाजीराव चौधरी, श्री. प्रमोद आप्पा धोंडू चौधरी, श्री. दिलीप आनंदा चौधरी, श्री. प्रविण भगवान चौधरी, श्री. विश्वनाथ रमेश चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. विक्रम (छोटुभाऊ) थोरात यांची उपस्थिती होती.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  रक्तदान शिबिरास पवन नगर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक युवकांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. आयोजक मंडळाने या उपक्रमामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवत नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगितले.

- Advertisement -

  अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारात दाखवलेली कुशलता, न्यायप्रियता आणि जनसेवेचा ध्यास यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहिले आहे. त्यांच्या त्रिशतकी जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम