धुळे दर्पण न्यूज :- तालुक्यातील उडाणे गावात एका किरकोळ वादातून हाणामारी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवमंढी मंदिराजवळ झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पैसे काढत असलेल्या तिघांना हटकल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून गावातील परमेश्वर जगन्नाथ वाघ (वय ४०) या तरुणास जबर मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही घटना १ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान, धुळे तालुका पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये योगेश काळू बागुल, नानाभाऊ काळू बागुल आणि रामदास बागुल (सर्व रा. उडाणे) यांचा समावेश आहे.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकरणी परमेश्वर वाघ याचे बंधू ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघ (वय ४२) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, गावातील भिलाटी वसाहतीमधील देवमंढी मंदिराजवळ एक व्यक्ती झोपलेली असताना, तिच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न या तिघांकडून सुरू होता. हे लक्षात येताच परमेश्वर वाघ यांनी त्यांना हटकले. या साध्या हटकण्याचा राग आल्यामुळे तिघांनी मिळून त्याच्यावर जबर मारहाण केली. मारहाणीमुळे परमेश्वर याच्या शरीरात गंभीर दुखापत होऊन रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघांना अटक केली असून, या घटनेमुळे उडाणे गावात खळबळ उडाली आहे. पुढील तपास धुळे तालुका पोलिसांकडून सुरू आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


