धुळे दर्पण न्यूज :- काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा धुळे शहरात तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत दहशतवादाच्या विरोधात कठोर आणि सडेतोड भूमिका मांडण्यात आली. या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांनी आपले प्राण गमावले असून, देशभरात शोकमय वातावरण पसरले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष ॲड. इमरान शेख यांनी या वेळी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणत्याही धर्माच्या नावाने जर रक्तपात केला जात असेल, तर तो आमच्या धर्माच्या शिकवणीशी पूर्णतः विरोधात आहे. इस्लाम हा शांती, मानवता आणि समतेचा संदेश देतो. अशा कृत्यांना कोणताही समाज किंवा धर्म कधीच मान्यता देऊ शकत नाही.”
| - Advertisement - |
त्यांनी यावेळी देशातील काही राजकीय नेत्यांवरही सडकून टीका केली. “जे समाजात द्वेष पसरवतात, ते मानसिक दहशतवादी आहेत. एका धर्माच्या नावाखाली इतर धर्मांबद्दल तिरस्कार पसरवणारे देशाच्या ऐक्याला धोका पोचवतात. ‘इतर धर्मीयांशी व्यवहार करू नका’ असे म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या विचारसरणीचा आत्मपरीक्षण करावे. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क आहे – मग तो निधी मुस्लिम देशांमधून येणाऱ्या करारांमधून मिळत असेल, तरी तो स्वीकारताना धर्म आठवत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सभेमध्ये “दहशतवादाचा जाहीर निषेध करा – मानवतेचा स्वीकार करा”, “एकतेतच शक्ती आहे”, “धर्माच्या नावाखाली हिंसाचार नको” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
![]() |
| - Advertisement - |
या सभेला राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मिनहाज काजी, सचिव ॲड. अश्फाक शेख, खजिनदार शोएब शेख, जिल्हा संघटक अल्ताफ बेग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक, युवा कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या सभेसाठी एकवटले होते.
या कार्यक्रमातून एक ठोस आणि जबाबदार संदेश शहरवासीयांपर्यंत पोचवण्यात आला – दहशतवाद हा कोणत्याही स्वरूपात स्वीकारार्ह नाही. तो केवळ देशद्रोहच नव्हे, तर मानवतेविरोधी गुन्हाही आहे. धर्माच्या नावाखाली घडणारे हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने पुढे येणे ही काळाची गरज आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर) (आपल्या धुळे शहराची नवी दिशा) तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम |


