धुळे दर्पण न्यूज :- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), धुळे कार्यालयामार्फत या शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या ४८ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जयेश बळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरादरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर व तांत्रिक माहिती देण्यात आली. यामध्ये बायोफ्लॉक तंत्रज्ञान, रास (Recirculatory Aquaculture System), पिंजरा संवर्धन, यांसारख्या आधुनिक मत्स्यपालन पद्धतींविषयी माहिती देण्यात आली.

- Advertisement -

  तसेच, केंद्र शासनाच्या ई-श्रम कार्ड योजना, अपघात गट विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड योजना, तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या NFDB (National Fisheries Development Board) अंतर्गत मच्छीमारांची नोंदणी प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व शासकीय अनुदानाबाबत माहितीही लाभार्थ्यांना देण्यात आली.


  शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना विभागाच्या वतीने प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष देसाई, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, व अविनाश गायकवाड, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी आपल्या सखोल ज्ञानातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन प्रभावीपणे पार पडावे यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांवरून झालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.


  या उपक्रमामुळे मत्स्यपालन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन लाभार्थ्यांना अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्या येत आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -