धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात भाऊच्या जामिनासाठी वकीलांना भेटू नये, या कारणावरून एका तरुणाला फाईटने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

  मिळालेल्या माहितीनुसार, मोहसिन मलक अब्दुल रहमान (वय ३२, रा. मित्तल नगर, वडजाई रोड, धुळे) हे आपल्या भाऊ हासिम मलक अब्दुल रहमान यांच्या जामिनासाठी वकिलांना भेटण्यासाठी १७ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयात गेले होते. याच दरम्यान नवीन इमारतीजवळ आफीस खान ऊर्फ आशु नाटया याने शिवीगाळ करत मोहसिन यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि हातातील फाईटने त्यांच्या डाव्या कानावर वार करून जखमी केले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  घटनेत मोहसिन यांना दुखापत झाल्याने त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आफीस खान ऊर्फ आशु नाटया, नसिर खान, हमजा शा बाबा शाह, साबीर पटेल, अजित पटेल व अफताब शेख आसिफ शेख (सर्व रा. मोगलाई, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


  या घटनेचा तपास पोलीस हवालदार कोकणी करीत असून, न्यायालय परिसरासारख्या संवेदनशील भागात अशा प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -