धुळे दर्पण न्यूज :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, धुळ्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने शिवसेना (ठाकरे गट) तर्फे प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान राबवले जाणार आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
हे अभियान १० ते १९ मे या कालावधीत देवपूर येथील जीटीपी स्टॉप परिसरातील महर्षी व्यास नगरमधील प्लॉट क्रमांक २२ येथे सुरू राहील. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत मतदार नोंदणीसाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
या अभियानाचे नेतृत्व शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी करत असून, त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे अभियान राबवून अनेक नागरिकांची नावनोंदणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागील पाच वर्षांत त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे ५०० ते ७०० नव्या मतदारांची नोंदणी झाली होती.
यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरात १८ ते २१ वयोगटातील नवमतदार, शहरात स्थलांतरित होऊन आलेले नागरिक, तसेच अद्याप मतदार यादीत नाव नोंदले नसलेले नागरिक आपली नोंदणी करू शकतील. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी जाऊन नोंदणीची सुविधा देखील दिली जाणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या अभियानासंदर्भात माहिती देताना ललित माळी यांनी सांगितले की, "लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपल्या प्रभागाचा विकास, सुविधा, आणि हक्क सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकाने मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. म्हणूनच नागरिकांनी यामध्ये सक्रियपणे सहभाग घ्यावा."
![]() |
| - Advertisement - |
या अभियानाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करत लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



