धुळे दर्पण न्यूज :- भारतीय सैन्याने "ऑपरेशन सिंदूर"च्या माध्यमातून अतिरेक्यांविरोधात मोठा यशस्वी कारभार करत पाकिस्तानातील ९ अतिरेकी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या भीमपराक्रमी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील संतोषी माता चौकात जल्लोषात भरभरून देशप्रेम व्यक्त करण्यात आले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शिवसेना जइउ तगछढ आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व शेळी-मेंढी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शिवसैनिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम् आणि पाकिस्तानविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
![]() |
| - Advertisement - |
पुलवामा घटनेतील शहीद जवानांचा बदला घेत भारतीय सैन्याने "ऑपरेशन सिंदूर"द्वारे पुन्हा एकदा आपल्या ताकदीचे दर्शन घडवले आहे, असे यावेळी बाळासाहेब किसवे यांनी सांगितले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय लष्कराने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे की भारत आता कोणत्याही प्रकारच्या दहशतीला मूग गिळून बसणार नाही. हा बदलत्या भारताचा आवाज आहे," असे मनोज मोरे यांनी वक्तव्य केले.
कार्यक्रमास उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन देशभक्तीचे घोष दिले आणि परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या नैराश्याला विराम देत भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे नवचैतन्य संचारल्याचे नागरिकांनीही सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
यावेळी विठ्ठल महानोर, अशोक गिरी, संजय कुसळकर, भटु भोपे, सुयश करचे, हेमंत भोईटे, योगेश धरम, पंढरी जायपुरे, कृष्णा शिंदे, संजय पवार, सतीश सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, किशोर पाटील, प्रवीण वाडलेकर, अरविंद सुडके, रवी शिंदे, अक्षय भदाणे, अजय पाटील, बबलू श्रीखंडे, विजय झोटिंग, सनी मोरे, संदीप खैरनार, भूषण पाटील, अस्लम खाटीक, हाशिम कुरेशी, जिया अन्सारी, बबलू शेख, मुसताक भाई आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
![]() |
| - Advertisement - |
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने झुंजणाऱ्या वीर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम करत, "जय हिंद! जय महाराष्ट्र!" अशा जयघोषांनी संपूर्ण चौक देशभक्तीने भारावून गेला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



