धुळे दर्पण न्यूज :- धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात ५ कोटी रुपये रोख रक्कम आमदारांना देण्यासाठी आणल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली असून, गोटे आणि अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
अनिल गोटेंनी थेट आव्हान देत म्हटलं, “सरकार तुमचंच आहे. मी खोटं बोलत असेल तर मला अटक करा!” यासह त्यांनी खोतकरांना अनेक ठोस प्रश्न विचारले आहेत.
![]() |
| - Advertisement - |
गोटेंचे आरोप काय आहेत?
अनिल गोटे म्हणाले, “अर्जुन खोतकर मला किती वर्षांपासून ओळखतात हे त्यांनी सांगावं. पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या माणसावर किती विश्वास ठेवायचा? विश्रामगृहात सापडलेले १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये नेमके कोणाचे? तुमचा पीए १५ मे २०२५ पासून तिथे काय करत होता?” या प्रश्नांसह त्यांनी खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
खोतकरांचा बचाव
दरम्यान, मंत्री अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना प्रतिक्रिया दिली की, “सरकार आणि समितीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. हे राजकीय हेतूनिशी रचलेलं नाटक आहे. अनिल गोटेंना आरोप करून प्रसिद्धी मिळवायची सवय आहे,” असे ते म्हणाले.
![]() |
| - Advertisement - |
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी देखील खोतकरांवर घणाघाती टीका केली. “धुळे विश्रामगृहात १५ कोटी रुपये गोळा करण्यात आले, हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाची गरज नाही. ही ईडीची केस आहे, खोतकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.” असं ते म्हणाले. तसेच त्यांनी खोतकरांवर भ्रष्टाचाराच्या उद्देशाने अंदाज समितीचे अध्यक्षपद मिळाल्याचा आरोपही केला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
राजकीय वाद चिघळतोय
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. एकीकडे अनिल गोटे सरकारच्या जबाबदारीवर बोट ठेवत आहेत, तर दुसरीकडे मंत्री खोतकर आणि सत्ताधारी गट सर्व आरोप नाकारत आहेत. दरम्यान, ही रक्कम नेमकी कोणाची? कोणत्या उद्देशाने ती ठेवण्यात आली होती? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
यापुढे हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल, याकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.



