धुळे दर्पण न्यूज :- नरडाणा (ता. शिंदखेडा, जि. धुळे), शासनाच्या टेक्सटाईल हब योजनेअंतर्गत नरडाणा एमआयडीसी परिसरात औद्योगिक विकासासाठी देण्यात आलेल्या शासकीय भूखंडांवर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात शासकीय अधिकारी, बँक व्यवस्थापक व खाजगी उद्योजकांच्या संगनमतातून हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी शिंदखेडा न्यायालयाने थेट ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
नाशिक विभागीय अँटी करप्शन कमिटीचे सदस्य अॅड. कृष्णा मोरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला असून, माहिती अधिकार कायद्यातून मागवलेल्या दस्तऐवजांच्या आधारे हे प्रकरण उघड झाले. त्यांनी यापूर्वी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, योग्य ती कारवाई न झाल्याने त्यांनी शिंदखेडा येथील न्यायालयात दाद मागितली.
![]() |
| - Advertisement - |
शासकीय भूखंडांवर बनावट कागदपत्रांद्वारे ताबा व कर्ज उचल
शासनाच्या धोरणानुसार नरडाणा एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल हब विकसित करण्यासाठी भूखंड भाडेकरारावर देण्यात येत होते. मात्र, काही खाजगी उद्योजकांनी एमआयडीसीचे तत्कालीन अधिकारी, इंडियन बँक पुणे शाखेचे व्यवस्थापक व अधिकारी, तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड मिळवले. या भूखंडावर उद्योग उभारणीचा केवळ दिखावा करण्यात आला. प्रत्यक्षात कोणताही उद्योग सुरू न होता, त्या भूखंडाचे अतिकिंमती मुल्यांकन करून त्याविरोधात कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून अपहार करण्यात आला.
न्यायालयाचा निष्कर्ष व आदेश
या प्रकरणात शिंदखेडा येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-1 श्रीमती व्ही. ए. नाईक यांनी सुनावणी घेतल्यानंतर स्पष्ट निष्कर्ष नोंदवला की, आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय भूखंड मिळवला व त्याविरोधात बेकायदेशीररीत्या कर्ज उचलून शासनाची फसवणूक केली. त्यांनी नमूद केले की, प्रत्यक्षात कोणताही उद्योग उभा नसून शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग व आर्थिक अपहार झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, अन्य संबंधितांची संलग्नता असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशीची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी
या प्रकरणी शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३१४, ३१६ (१)(२)(४)(५), ३९८ (२)(४), ३१८ (२)(३), ३२२, ३२३, ३२४, ३३६ (१)(२)(३), ३४०, ३४०(२), ६१(१)(२), ६२ सह ३(५) अंतर्गत खालील ३१ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
सचिन भिकचंद जैन, बिग पी. प्रॉपर्टीज प्रा.लि., डॉ. अरुणकुमार रतनलाल जैन, डॉ. प्रितेश नरेश मुणोत, पुनीत रमेश अग्रवाल, अतिथी पंकज अग्रवाल, शितल महावीर जैन, जगदीश अशोक खलाणे, सुनिल मुरलीधर लढाणी, के. के. मुंदडा, राजश्री जैन, दिपक सोनवणे, गौरव कश्यप, उमंग अग्रवाल, नितीन भिमराव कडावकर, नरेश एम. मुणोत, एमआयडीसी अधिकारी जितेंद्र काकुस्ते, नम्रता पवार, अरुण आनंदकर, एस.एम. भोर, आर.एस. बहिरम, एस.बी. पोटे, व्ही.एम. चौधरी, एस.एम. वैजापूरकर, एन.डी. शेवाळे, अॅड. योगेश महाजन (एमआयडीसीचे विधी सल्लागार), इंडियन बँक पुणेचे शाखा व्यवस्थापक चंदन इश्वर गोस्वामी, जी. जयशंकर, दीपक दुबे आदी.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकरणात तक्रारदार अॅड. कृष्णा मोरे यांची बाजू अॅड. सी.जे. सूर्यवंशी यांनी ठामपणे न्यायालयात मांडली. त्यांना अॅड. निलेश माळी आणि अॅड. आनंद कुलकर्णी यांचेही सक्रिय सहकार्य लाभले. अँटी करप्शन कमिटीच्या माध्यमातून शासकीय संपत्तीचा अपहार रोखण्यासाठी करण्यात आलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
अधिक तपास अपेक्षित
न्यायालयाच्या आदेशानंतर आता शिंदखेडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत. या प्रकरणात आणखी दोषी व्यक्तींचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता असून, भविष्यात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



