धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वरखेडी रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये सोमवारी सकाळी अचानक आग लागून खळबळ उडाली. ही आग इतकी भीषण होती की, धुळीच्या आकाशात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. अग्निशमन दलाने दिवसभर शर्थीचे प्रयत्न करून तब्बल २० फेऱ्यांनंतर सायंकाळी ही आग अखेर नियंत्रणात आणली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपो हे धुळे महापालिकेचे मुख्य कचरा साठवण केंद्र आहे. येथे दररोज शहरातील ओला व सुका कचरा आणून टाकला जातो. या ठिकाणी सध्या बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू असून, गांडूळ खत प्रकल्पालाही या परिसरात विकसित करण्यात आले आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा, उन्हाळ्यात निर्माण होणारी उष्णता आणि मिथेन गॅसचा स्फोटक परिणाम यामुळे दरवर्षी येथे आगीची घटना घडते.
![]() |
| - Advertisement - |
सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. यानंतर अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र सकाळी १० वाजता आग पुन्हा भडकली. दुपारनंतर ही आग अधिकच भयावह बनली होती. परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे जवळच्या रहिवासी आणि पर्यावरणावरही त्याचा विपरित परिणाम झाला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी दिवसभर २० फेऱ्या केल्या. अखेर सायंकाळी ही आग नियंत्रणात आली. प्राथमिक अंदाजानुसार एक एकर क्षेत्रफळावर कचरा पसरवण्यात आला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुक्या व ज्वलनशील कचऱ्याचा साठा असल्याने आग झपाट्याने पसरली.
![]() |
| - Advertisement - |
महापालिका प्रशासनाने सांगितले की, दरवर्षी उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याच्या साठवणुकीसाठी आणि बायोमायनिंग प्रक्रियेसाठी सुरक्षित पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


