धुळे दर्पण न्यूज :- शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विधानसभा निवडणुकीतील वचनपूर्तीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आमदार अनुप अग्रवाल यांनी "प्रभू श्रीराम थीम पार्क" उभारण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सर्वे क्रमांक ५१० ड या शासकीय ५० एकर जागेवर हा थीम पार्क साकारण्यात येणार आहे. सुमारे २०० कोटींच्या खर्चाचा हा प्रकल्प असून, यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि रोजगारनिर्मितीत मोठी भर पडणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
थीम पार्कमध्ये काय असेल खास?
या थीम पार्कमध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर, रामायणावर आधारित विविध देखावे, सुंदर गार्डन, शरयू नदीच्या धर्तीवर घाट, बोटींगची सुविधा, प्राणीसंग्रहालय, तसेच भाविकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची जागा अशी विविध आकर्षणं असणार आहेत. हे संपूर्ण काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल आणि त्यासाठी निधीही तशाच प्रकारे उभारला जाणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत मोजणी
सोमवारी या जागेची अधिकृत पाहणी करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाचे अधिकारी, अभियंते, नगरसेवक, व भाजपचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार अग्रवाल यांनी स्वतः जागेची पाहणी करून पुढील टप्प्यातील नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी महापालिका उपायुक्त हेमंत निकम, अभियंता चंद्रकांत उगले, नगररचनाकार महेंद्र परदेशी, भाजपचे डॉ. सुशील महाजन, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
विकासाला विरोध नको – आमदारांचे आवाहन
आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, "ही योजना वैयक्तिक नसून संपूर्ण शहराच्या हिताची आहे. रावेर एमआयडीसी, प्रस्तावित रिंग रोड आणि हा थीम पार्क या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे धुळे शहराचा चेहरा बदलू शकतात." विरोधकांनी या प्रकल्पाला विरोध न करता, विकासाच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना ५०० ते ८०० पर्यंत थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून धुळेची ओळख राष्ट्रीय स्तरावर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
गौणखनिज चोरीबाबत गंभीर सवाल
थीम पार्कच्या जागेवर काही लोकांनी खाजगी मालकीचा दावा केल्याचे सांगण्यात आले. यावर आमदार अग्रवाल यांनी “जर ही जागा खासगी असेल, तर त्यावरील मुरुम व खडी कोण काढत होते?” असा गंभीर सवाल उपस्थित करत गौणखनिज चोरीबाबत शंका व्यक्त केली. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
शहराच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा
या प्रकल्पामुळे धुळे शहर एक नवा अध्याय लिहिणार असून, धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर धुळेचे नाव झळकण्याची शक्यता आहे. श्रीराम थीम पार्क हा केवळ एक करमणूक केंद्र न राहता, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



