धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवार, दिनांक २ मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्ह्यातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी काही उपाययोजना आणि सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः लग्नसमारंभांच्या पार्श्वभूमीवर काही बंधने घालण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना:
1. वाढत्या तापमानाचा विचार करता दुपारी १२ वाजेच्या आत लग्न लावण्याचा सल्ला.
2. दुपारी १२ ते ४ या वेळेत बँड, डीजे वाजवण्यास मनाई.
3. दुपारी २ नंतर वरातीतील नृत्य व टाळ्या टाळाव्यात.
4. प्रवास करताना किंवा लग्न सराईला जाताना उन्हात जाणे शक्यतो टाळा.
5. हलके, सुती आणि शक्यतो पांढरे कपडे परिधान करा.
![]() |
| - Advertisement - |
6. डोक्यावर टोपी किंवा रूमाल वापरा.
7. भरपूर पाणी प्या, लिंबूपाणी व ओआरएस घ्या.
8. गरम पेय, कोल्ड्रिंक्स, मद्यपान व धूम्रपान टाळा.
9. त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आरोग्यावर परिणाम स्पष्टपणे जाणवतो
धुळेतील आरोग्य संस्थांच्या माहितीनुसार, उष्णतेशी संबंधित त्रासांमध्ये वाढ झाली आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, अंगदुखी, आणि अशक्तपणा यांसारख्या लक्षणांमुळे नागरिक वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल होत आहेत.
नागरिकांनी घ्यावी ही काळजी:
• शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
• शरीराला थंडावा देणारे पदार्थ, जसे की ताक, लिंबूपाणी, सरबत यांचा नियमित वापर करा.
• घरात शीतकरणाची सोय नसेल तर गार पाण्याने स्नान करा किंवा ओल्या रुमालाचा उपयोग करा.
• लहान मुले, वृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांची विशेष काळजी घ्या.
![]() |
| - Advertisement - |
धुळेकरांनो, उष्णतेचा धोका गांभीर्याने घ्या!
प्रशासनाकडून सूचना जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांचा सहकार्य आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



