![]() |
| - Advertisement - |
हा सन्मानाचा व भावनिक क्षण पतसंस्थेच्या कार्यालयात चेअरमन श्री गिरीश भाऊ चौधरी, सचिव श्री नितीन विसपुते, संचालक श्री कैलास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संचालक मंडळातील श्री चंद्रकांत भदाणे, श्री केशव ठाकरे, श्री सुभाष पाटील, श्री प्रकाश अहिरे, श्री कैलास फुलपगारे, श्री प्रमोद शिरसाठ, श्री भगवान खैरनार, श्री देविदास मोरे, श्री सानप, श्री शांताराम सोनार, श्री योगेश देवरे, श्री भंडारी हे मान्यवरही उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री कृष्णा भाऊ शिंदे यांना पुष्पगुच्छ व नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे सेवानिवृत्ती जीवन सुखी, समाधानी आणि आरोग्यमय जावे, अशा मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भावनिक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना श्री कृष्णा भाऊ शिंदे यांनी, “सेवानिवृत्तीच्या या विशेष दिवशी, पतसंस्थेने मला माझ्या मेहनतीने साठवलेली रक्कम सन्मानपूर्वक दिली, यासाठी मी चेअरमन श्री गिरीश भाऊ चौधरी, सचिव श्री नितीन विसपुते आणि संचालक श्री कैलास पवार यांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो,” असे सांगून आपल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
हा समारंभ नुसता औपचारिक कार्यक्रम न राहता, एक गौरवाचा क्षण ठरला. पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाला केवळ आर्थिक आधार मिळतोच, पण सेवानिवृत्तीच्या काळातही त्यांचा गौरव करण्यात येतो, हे या सोहळ्याद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


