धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील प्रमोद नगर भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत एका महिला प्राध्यापिकेशी बँकेच्या व्यवस्थापकाने केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धुळे जिल्हा युनिटकडून आज आक्रमक पवित्रा घेत, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  प्राप्त माहितीनुसार, धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राध्यापिका श्रीमती पद्मा किसन शिंदे यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोद नगर शाखेत असून, त्या दि. ८ जून रोजी काही खात्याशी संबंधित कामासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यावेळी बँकेचे व्यवस्थापक अतुल गांधी यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार मराठी भाषेचा अपमान करत, "तुम साले मराठी, हमारे पैरों के नीचे रहेंगे" अशा प्रकारचे अवमानकारक उद्गार काढले. एवढेच नव्हे, तर त्यांना "मी गुजराती आहे, आमचेच राज्य आहे" असे म्हणत धमकावण्यात आले, असेही शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

  सदर प्रकारानंतर प्राध्यापिका शिंदे देवपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेल्या असता, पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी त्यांना एक तास बाहेरच थांबवून ठेवले. त्याचवेळी बँकेचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये आत जात निवांत बसले, परंतु प्राध्यापिका यांना आत न घेता अपमानास्पद वागणूक देण्यात आली. शिवाय, सदर प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस प्रशासनाने उलटप्रवाही भूमिका घेत, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांविरुद्धच खोटे गुन्हे दाखल करून अटक केली, असा आरोपही निवेदनात करण्यात आला.

  या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मराठी भाषेचा आणि मातृभाषिकांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

- Advertisement -

  शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मागणी केली की, बँकेचे व्यवस्थापक अतुल गांधी यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करण्यात यावी आणि प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात काम करायचे असल्यास स्थानिक भाषेचा सन्मान राखावा लागेल, अन्यथा अशा अधिकाऱ्यांची राज्याबाहेर हकालपट्टी झाली पाहिजे.

  यावेळी महिला आघाडीच्या नेत्या शुभांगी पाटील, ज्योती चौधरी, प्रशांत भदाणे, संदीप सूर्यवंशी, पीनू सूर्यवंशी, कपील लिंगायत, सचिन रुणवाल, अजय चौधरी, निलेश कांदेकर, किरण भास्कर, राजू पाटील, भरत मोरे, शिवाजी शिरसाळे, तेजस सपकाळ, महादू गवळी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -

  संपर्क साधला असता, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी सांगितले की, "ही केवळ एका महिलेसोबत घडलेली घटना नाही, तर संपूर्ण मराठी समाजाचा अपमान आहे. आम्ही लवकरच या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तीव्र आंदोलन छेडू."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  सदर प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणात तत्काळ आणि पारदर्शक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -