धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून नगरविकास विभागाने राज्यातील २९ महापालिका तसेच नगरपालिका व नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचे आदेश जाहीर केले आहेत. यानुसार धुळे महानगरपालिकेतील प्रभाग रचनेची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक प्रभागात चार नगरसेवकांची निवड होणार असून, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष व मतदारांचे लक्ष या रचनेवर केंद्रीत झाले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

प्रभाग रचनेसाठी आयुक्तांना आदेश

  राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी संमत अधिनियमानुसार अ, ब व क वर्गातील महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, जळगांव आणि धुळे अशा ११ महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात येत आहे.

- Advertisement -

  महापालिकांच्या कार्यकाळाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य शासनाला नव्या प्रभाग रचनेचे आदेश दिले असून, नगरविकास विभागाने ते आदेश आयुक्तांपर्यंत पोहचवले आहेत. त्यानुसार धुळे महापालिका आयुक्तांनी तत्काळ प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

प्रभाग रचना आठ टप्प्यांत पूर्ण होणार

  प्रभाग रचना ही सविस्तर, आठ टप्प्यांत पार पडणारी प्रक्रिया आहे. प्रथम प्रभागाचे प्रारूप तयार केले जाईल. त्यानंतर त्या प्रारूपावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचना व हरकतींवर सुनावणी होईल व अंतिम स्वरूप तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केली जाईल.

- Advertisement -

  या प्रक्रियेसाठी जवळपास अडीच महिने लागणार असल्याने, प्रभागांची अंतिम रचना ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर होईल आणि त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल.

गुगल मॅपच्या आधारे प्रभाग आखणी

  धुळे महापालिकेसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहरासाठी तांत्रिक अचूकता महत्त्वाची असल्याने यावेळी प्रभाग रचनेत गुगल मॅपचा आधार घेण्यात येणार आहे. यामुळे नागरी वस्त्या, नवविकसित क्षेत्र, विस्तार योजना आणि लोकसंख्येच्या प्रमाणात समतोल राखून प्रभाग तयार केले जाणार आहेत.

- Advertisement -

आगामी निवडणुका ठरणार निर्णायक

  महापालिका निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२५ दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी व संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. चार नगरसेवक असणाऱ्या प्रभाग रचनेमुळे स्थानिक राजकारणाचा समिकरण बदलणार असून, मतदारसंघातील राजकीय गटांची पुनर्रचना होणार आहे.

  महापालिकेतील सत्तांतर, विकासाचे प्रश्न, पक्षांतरांचे संभाव्य धोरण, महिला आरक्षणाचा मुद्दा, नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळेकरांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असून, शहराच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे.


धुळे महापालिकेतील बदलत्या राजकीय चित्रासाठी तयार राहा!

🗓️ निवडणुकांच्या दृष्टीने पुढील महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार, नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे आवश्यक आहे.


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम