धुळे दर्पण न्यूज :- जमिनीच्या विक्रीतून दीडपट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १ कोटी ७८ लाख ७८ हजार ९७९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धुळेतील सेवानिवृत्त तहसीलदार हिरामण गंभीर बळसाणे यांची फसवणूक झाली असून, आझादनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही फसवणूक २० जानेवारी २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत, प्रकाश मेहता यांच्या कार्यालयात घडली. संशयितांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार केले आणि खोटी माहिती देत जमीनीची विक्री केली. हे बनावट कागदपत्र सत्य असल्याचे भासवत, तक्रारदार बळसाणे आणि प्रकाश मेहता यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकरणात खालील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
- सुरेश घोरी (वय ५६, रा. सुरत)
- दीपक पाटील (वय ४५, रा. छत्रपती संभाजीनगर)
- स्वामी विजयप्रकाश (वय ४५, रा. आणंद)
- स्वामी दर्शनप्रिय (वय ४७, रा. आणंद)
- भूपेंद्र शानाभाई पटेल (वय ५७, रा. गांधीनगर)
- विजय आलुसिंग चौहान (वय ५६, रा. अरवली)
या सर्वांनी एकत्र येत कट रचून बनावट मालमत्तेचे कागद तयार केले आणि ती जमीन १ कोटी ७८ लाखांच्या बदल्यात विकल्याचे भासवले. यामुळे तक्रारदाराची आर्थिक आणि मानसिक हानी झाली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सध्या आझादनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फसवणूक करून रकमेचा अपहार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
![]() |
| - Advertisement - |
.jpeg)


