आज सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास, एसटी महामंडळाची एक बस मालेगाव रोडवरील रेल्वे फाटक ओलांडत असतानाच अचानक थांबली. इंजिन बंद पडल्याने बस रेल्वे ट्रॅकवरच अडकून पडली. ही स्थिती लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेच्या आगमनाची शक्यता लक्षात घेता त्यांनी दुसऱ्या बाजूचे फाटक बंद न करता प्रथम सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून काही काळासाठी रेल्वे सेवा थांबवण्याची विनंती केली. दरम्यान, परिसरातील जागरूक नागरिकांनी देखील पुढाकार घेत, बस हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कित्येक नागरिकांनी मिळून ही नादुरुस्त बस ढकलत रस्त्याच्या कडेला नेली, आणि काही मिनिटांतच रेल्वे मार्ग मोकळा करण्यात यश मिळाले.
![]() |
| - Advertisement - |
ही संपूर्ण घटना काही मिनिटांत उलगडली, परंतु या थोड्याच वेळात दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. परंतु, रेल्वे गेल्यानंतर आणि बस रस्त्याच्या कडेला करण्यात आल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
या घटनेबाबत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर बस थोडा वेळ जरी ट्रॅकवर राहिली असती, तर रेल्वे आणि बसमध्ये थेट धडक होऊन मोठा अपघात घडला असता. एसटीमधील प्रवाशांची आणि चालक-वाहकांची सुरक्षितता संकटात आली असती.
![]() |
| - Advertisement - |
या घटनेनंतर अनेकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि मदतीला धावून आलेल्या नागरिकांचे कौतुक केले. त्यांच्याच प्रसंगावधानामुळे आणि धैर्यामुळे एक जीवघेणा प्रसंग टळला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील अमळनेरजवळही रेल्वे अपघाताची एक घटना घडली होती. भुसावळहून नंदुरबारच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरली होती. त्या वेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र रुळांचे मोठे नुकसान झाले होते आणि काही काळासाठी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


