• धुळे दर्पण न्यूज :- राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट स्वाक्षरीनिशी खोटे नियुक्तीपत्र तयार करून मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवले गेले, आणि चाळीसगाव तालुक्यातील एका निरपराध युवतीची थेट फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
युवतीला ‘लिपिक’ पदावर नोकरीचे आमिष
ही संपूर्ण घटना चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील गीता कापडणे या युवतीच्या बाबतीत घडली. मंत्रालयातील ‘लिपिक’ पदासाठी नियुक्ती मिळवून देतो, असे सांगून तिला एक अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने, त्यांच्या लेटरहेडवर बनावट स्वाक्षरीनिशी तयार करण्यात आले होते. या पत्रावर ‘मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ यांच्या नावाची छाप आणि नक्कल स्वाक्षरी वापरून सरकारचा विश्वासहीत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता.
![]() | |
|
संशय वाटल्यानंतर चौकशी केली अन् फसवणुकीचा उलगडा
गीता कापडणे यांना या नियुक्तीपत्राच्या सत्यतेबाबत शंका वाटू लागल्यानंतर त्यांनी थेट चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांना धक्कादायक माहिती समजली. हे बनावट पत्र सर्वेश प्रमोद भोसले या व्यक्तीकडून देण्यात आले होते. यामध्ये रणजीत मांडोळे व तुषार उर्फ रोहित बेलदार यांचाही सहभाग असल्याचे समोर आले.
बनावट पत्र तयार करण्यामागील शक्कल
पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सर्वेश भोसले याने इंटरनेटवर “CM officer letter Maharashtra” असा सर्च करून मुख्यमंत्र्याच्या लेटरहेडचा नमुना शोधून काढला. त्यानंतर खडकी येथील स्वामी ग्राफिक्स या दुकानात रणजीत मांडोळे यांच्या मदतीने बनावट मजकूर तयार करून त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सहीची नक्कल केली. हेच पत्र ‘ऑफिशियल जॉइनिंग लेटर’ म्हणून गीता कापडणे यांना देण्यात आले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच गीता कापडणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि शासकीय अधिकाराचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मुख्यमंत्री कार्यालयाची भूमिका
या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवण्यात आली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, अशा कोणत्याही नियुक्त्या अधिकृत विभाग प्रमुख किंवा सचिवांच्या सहीशिवाय होत नाहीत, आणि मुख्यमंत्र्यांची थेट स्वाक्षरी अशा पत्रांवर असणे शक्यच नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.
![]() |
| - Advertisement - |
फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक धोकादायक
या घटनेमुळे पुन्हा एकदा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंटरनेटवरील माहितीचा गैरवापर करून बनावट सरकारी दस्तऐवज तयार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, सामान्य नागरिक अशा लबाडांच्या जाळ्यात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शासकीय नोकरी किंवा नियुक्ती मिळत असल्यास, तिची पडताळणी अधिकृत संकेतस्थळांवरून किंवा थेट संबधित विभागात करूनच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.



