धुळे दर्पण न्यूज :- धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज शेतकरी व पशु व्यापाऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्री केली जाते. मात्र महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सूचनेनुसार ३ जून ते ८ जून २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती बाजार समितीचे सभापती श्री. बाजीराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
![]() |
| - Advertisement - |
सदर बंदी आदेशानुसार बैल, गोन्हा, गाय, वासरु, म्हैस, हेले, वगार-पारडी या सर्व जनावरांची कोणतीही खरेदी-विक्री बाजार समितीच्या आवारात होणार नाही. शेतकरी व जनावरांचे व्यापारी यांनी या कालावधीत जनावरे बाजारात विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
यावेळी बोलताना सभापती पाटील यांनी सांगितले की, “गोसेवा आयोगाच्या सूचनेला अनुसरून ही तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. जनावरांच्या कल्याणासाठी आणि प्रशासनाच्या नियमनास सहकार्य करण्यासाठी सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती आहे.”
![]() |
| - Advertisement - |
बाजार समिती प्रशासनानेही बंदी काळात आवारात गस्त वाढविण्यासह आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ही बंदी कालावधी संपल्यानंतर पुन्हा पूर्ववत खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात येतील, अशी माहितीही समितीकडून देण्यात आली.
शेतकऱ्यांनी व व्यापार्यांनी कोणताही गैरसमज न बाळगता या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpeg)
.jpg)
